ड्रोन पायलटसाठी भविष्य उज्ज्वल

drone
येत्या कांही वर्षात ड्रोन क्षेत्रात लक्षावधी नोकर्‍या निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत असून त्यात ड्रोन पायलट, ड्रोन निर्माते, तंत्रज्ञ यांना नोकर्‍यांची मोठी संधी असेल असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. चालकरहित विमाने अथवा हेलिकॉप्टर्सना ड्रोन म्हटले जाते.

कांही काळापूर्वी फक्त लष्करी प्रयोगांसाठी उपलब्ध असलेली ड्रोन आता अनेक क्षेत्रात वापरात आणली जात आहेत. त्यात फिल्म शूटिंग, जंगलातील वन्य प्राणी मोजणी, नामशेष होत चाललेल्या जाती वाचविणे, मालाची डिलिव्हरी, जंगलातील वणवे विझविणे, पाईप लाईनवरची देखरेख, रस्ते बांधकामांवर नजर ठेवणे, शेती, तेल गॅसचा शोध, जनसुविधा अशा अनेक क्षेत्रांचा समावेश आहे.

यासाठी ड्रोन मिर्मिती करणारे, सिस्टीम इंजिनिअर, पायलटस, तंत्रज्ञ, डिझायनर्स, सेंसर ऑपरेटर्स, फोटोग्राफर अशा अनेक क्षेत्रातील तज्ञांची गरज निर्माण झाली आहे. आणि या क्षेत्रातील तज्ञांना मागणीही खूप मोठी आहे.१९ व्या शतकात लष्करासाठी प्रथम ड्रोन चा वापर सुरू झाला. जपानमध्ये १९८० च्या दशकांत शेतीसाठी ड्रोन वापरात आणली गेली. आज स्मार्टफोनवर चालणारी ड्रोन ही उपलब्ध आहेत.

युरोपियन कमिशन इंपॅक्ट असेसमेंट सेंटरच्या अहवालानुसार जगात २०२० सालापर्यंत ड्रोन व्यवसायात ४ अब्ज युरोंची उलाढाल अपेक्षित आहे. अमेरिकेतील ड्रोन पायलटना आत्ताच वर्षाला ८० ते १ लाख डॉलर्सपर्यंत पगार दिला जात आहे. भविष्यात त्यात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment