चक्क 'बुलेट'वरून लग्न मंडपात नवरीची 'एंट्री' - Majha Paper

चक्क ‘बुलेट’वरून लग्न मंडपात नवरीची ‘एंट्री’

bullet
अहमदाबाद – बुलटचे आजच्या तरुणांमध्ये खूपच आकर्षण आहे. पण याबाबतीत मुलीही काही मागे नाहीत. अहमदाबादेत स्वत:च्याच लग्न मंडपात नवरीने बुलटेवरुन एंट्री केल्यामुळे नवरदेवानेही शरमेने मान खाली घातली.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अहमदाबादेत हा विषय चर्चेचा ठरला आहे. आयशा उपाध्याय असे या नवरीचे नाव असून, ती १३ वर्षापासून दुचाकी चालवत आहे. २६ वर्षीय आयशा इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती, तेव्हापासून तिला दुचाकीची आवड आहे, असे ती सांगते. सध्या आयशा पीडी पंड्या इंस्टिट्यूट ऑफ कंम्प्यूटर अॅप्लिकेश शिक्षिका आहे. महाविद्यालयात ती बुलेटवरच जायची. शिवाय फिरण्यासाठीही ती बुलटवरुन जायची. ही बुलेट आयशाला तिच्या भावाकडून रक्षा बंधनची भेट देण्यात आली आहे. मात्र, आयशाचा पती लौकीक व्यासला बुलेट चालवता येत नाही.

Leave a Comment