गुगलचे नवीन ऑनलाईन कोर्स सुरु

google1
मुंबई : जगातील जाईंट सर्च इंजिन असलेल्या गुगलने नवा ऑनलाईन कोर्स सुरु केला असून गुगल इंजिनिअर्स जास्तीत जास्त यूझर्सना इंटरनेट फ्रेण्डली करण्यासाठी मोफत ऑनलाईन शिकवणी घेत आहेत.

आठवड्याला सहा तास चालणाऱ्या या प्रशिक्षण वर्गासाठी तुम्हाला तीन तास देणे आवश्यक आहे. युडेसिटी या शैक्षणिक वेबसाईटवर लर्निंग मॉडेल्स, लर्निंग सिस्टमबाबत ट्रेनिंग देण्यात येईल. अर्थात हा कोर्स नवोदितांसाठी नाही, असेही गुगलने स्पष्ट केले आहे. किमान दोन वर्षांचा प्रोग्रामिंगचा अनुभव असणाऱ्या विद्यार्थ्यांनीच यासाठी नोंदणी करावी, असे युडेसिटीने म्हटले आहे. मात्र स्वतःच्या सवडीनुसार विद्यार्थी हा कोर्स पूर्ण करु शकतात.

Leave a Comment