स्कायपूलमध्ये आकाशात पोहण्याची मजा

skypool
पोहोण्याचा शौक असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता हे हौशी आकाशातही पोहण्याची मजा लूटू शकणार आहेत मात्र त्यासाठी त्यांना लंडनवारी करावी लागेल इतकेच. श्रीमंतांच्या लाईफस्टाईलमध्ये आणखी ऐष करण्याची सुविधा देणारा स्कायपूल उभारला जात असून साऊथ वेस्ट भागातील दोन अ्रालिशान इमारतींच्या मध्ये उंचावर हा स्विमिंगपूल बांधला गेला आहे.

या जलतरण तलावात पोहण्याची मजा लुटतानाच आसपास पसरलेल्या लंडनच्या आकाशरेखाही न्याहाळता येणार आहेत. संसद, अमेरिकी दूतावास सारख्या इमारतीही येथून दिसतील. १० मजल्यांवर हा ९० फूट लांबीचा व ४ फूट खोलीचा स्विमिंग पूल पारदर्शक आरशांनी सज्ज आहे त्यामुळे सगळीकडे दृष्य सहज पाहता येणार आहे. इंजिनिअरींगमधील नवे कांही तरी म्हणून हा जलतरण तलाव बांधला गेला आहे. हा पूल एखाद्या प्रचंड तरंगत्या मत्स्यालयासारखा आहे मात्र तो पूर्ण सुरक्षित असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. बॅलीमोर ग्रूपने हा तलाव बांधला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार याची ग्लास बॉडी ८ इंच जाडीची असून बुलेटप्रूफ ग्लासपेक्षा ती सातपट जाड आहे. हा पूल २०१८ साली पूर्ण होणार आहे मात्र ज्या इमारतींवर हा तलाव आहे तेथील अपार्टमेंटची विक्री सप्टेंबर २०१६ पासून सुरू होणार आहे.

Leave a Comment