सुझुकीची इग्निस देणार २८ किमीचे मायलेज

suzuki
सुझुकी मोटर्सने त्यांच्या इग्निस या नव्या मॉडेलचे जपानमध्ये लाँचिंग केले असून ती पुढील महिन्यात दिल्लीत सुरू होत असलेल्या ऑटो शो मध्ये सादर केली जाईल. भारतातील फेस्टीव्ह सीझनमध्ये ती विक्रीसाठी बाजारात दाखल होईल असे सांगितले जात आहे. ही कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर कार तीन व्हेरिएंट मध्ये म्हणजे एमजी, एमएकस व एमझेड मध्ये सादर केली गेली आहे.

या कारसाठी १२४२ सीसी क्षमतेचे ४ सिलींडर के १२ ड्युअलजेट इंजिन व ३२ लिटरची इंधन टाकी दिली गेली आहे. ही कार २८ किमी पर्यंत मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे. कारला सीव्हीटी गिअरबॉक्स, ड्युअल फ्रंट, साईड, व कर्टन एअरबॅग्ज, लेन डिपांर्चर वॉर्निंग, इएसपी, हिल होल्ड, हिल डिसेन्ट कंट्रोल, ऑटोमॅटिक हेडलाईट, एलईडी हेड व फॉग लाईट, ऑटो क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, की लेस एन्ट्री वुइथ इंजिन स्टार्टर बटण अशा अनेक सुविधा दिल्या गेल्या आहेत. ब्ल्यूटूथ रनिंग म्युझिक सिस्टीमही आहे.

जपानमध्ये या कारची किमत १३८२ मिलीयन येन म्हणजे ८ लाख रूपयांपर्यंत असली तरी भारतात ही कार साडेचार ते ६ लाख रूपयांच्या दरम्यान मिळू शकेल असेही समजते.

1 thought on “सुझुकीची इग्निस देणार २८ किमीचे मायलेज”

Leave a Comment