खरच हे होईल का?

आगामी काही वर्षांत इतिहासजमा होऊ शकतात या गोष्टी
collarge
दिवसेंदिवस नवनवीन बदल विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घडत असल्यामुळे भविष्यात येणारे तंत्रज्ञान काय करू शकते, याविषयी आपण काही कल्पनाही करू शकत नाही. खाली दिलेल्या काही गोष्टी आगामी काही वर्षांत इतिहासजमा होऊ शकतात.
१. एटीएम कार्ड
1-atm
आताच्या काळात सर्व आर्थिक व्यवहार हे नेट बँकींगमुळे इतके सोपे होत आहे की आगामी काळात एटीएम कार्ड हद्दपार होऊ शकते. दररोज जाऊन पैसे काढण्याची गरज राहणार नाही की रोख रक्कम देण्याचीही गरज भासणार नाही. नुसते मोबाईलच्या एका क्लिकवर पैशांचे व्यवहार करणे सहज शक्य होईल.
२. मेमरी कार्ड
2-memory-card
आपल्या मोबाईलमध्ये आगामी काही काळात कदाचित मेमरी कार्डाची गरज भासणार नाही. क्लाऊड स्टोअरेजच्या माध्यमातून अनलिमीटेड स्टोअरेजची सोय उपलब्ध होईल.
३. पासवर्ड
3-password
भविष्यात आपले विविध पासवर्ड देखील हद्दपार होऊ शकतात. हे जरी पचण्यास कठीण असले तरी आवाजाच्या माध्यमातून सिक्युरिटी पुरवली जाऊ शकते.
४. रिमोट कंट्रोल
4-remote
आता नुसती टाळी वाजवून किंवा आवाजाच्या माध्यमातून ऑर्डर देणे नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकत त्यामुळे भविष्यात रिमोटची गरजही भासणार नाही.
५. गाडीची चावी
5-key
आता गाडीची चावी हरवण्याची चिंता करण्याची गरज नाही. कारण, तुमच्या मोबाईलद्वारे गाडीचा दरवाजा उघडता येईल. काही महागड्या गाड्यांमध्ये आत्ताच ही सोय उपलब्ध झाली आहे.
६. की बोर्ड
6-key-board
आपण कॉम्प्युटर बसल्यावर जशी माऊसची असते त्याच प्रमाणे टायपिंग करण्यासाठी की बोर्डची गरज सते आणि त्या की बोर्डवर टायपिंग करताना आपली बोटे देखील दुखतात पण आता त्याची चिंता राहणार नाही. कारण तुम्ही जे उच्चाराल ते कॉम्प्युटर टाईप करेल अशी सुविधा सध्या काही सॉफ्टवेअर्स देत आहेत. त्यामुळे तुम्हाला की बोर्डाला देखील बायबाय करावा लागेल.

Leave a Comment