आसूसचा पेगासस ५००० लाँच

asus
आसूसने त्यांच्या पेगासस सिरीजमधील पेगासस ५००० स्मार्ट फोन चीनमध्ये लाँच केला असून या स्मार्टफोनची रॅमवर आधारित दोन व्हेरिएंट कंपनीने लाँच केली आहेत. एक व्हेरियंट २ जीबीचे तर दुसरे ३ जीबी रॅमचे आहे. या फोन्सच्या किमती अनुक्रमे १२९९ युआन(१३,४०० रूपये) व १७९९ युआन ( १८५०० रूपये )आहेत.

या फोनसाठी ४८५० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. अँड्राईड ५.१ लॉलीपॉप ओएसचा हा फोन कंपनीच्या युजर इंटरफेस झेन युएलवर रन करेल. साडेपाच इंचाचा फुल एचडी आयपीएस डिस्प्ले, प्रोटेक्शनसाठी कॉर्निला ग्लास, १६ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ड्युअल सिम,१३ एमपीच एलईडी सह रिअर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. कनेक्टिव्हीटीसाठी फोरजी, थ्रीजी. वायफाय, एलटीई, ब्ल्यूटूथ, मायक्रो यूएसबी अशी ऑप्शन्स आहेत.

Leave a Comment