स्वाईपचा लॉन्च केला स्वस्त आणि मस्त ‘Virtue’

swipe
नवी दिल्ली : ‘Virtue’ हा स्वस्त आणि मस्त असा स्मार्टफोन स्वाईप या कंपनीने लॉन्च केला असून ‘Virtue’ची स्नॅपडील या ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्री सुरु झाली आहे. ५ हजार ९९९ रुपये एवढी या स्मार्टफोनची किंमत आहे.

कसा आहे स्वाईपचा ‘Virtue’ : यात 5 इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला असून ज्याचे रिझोल्यूशन ७२०×१२८० एवढे आहे. यात ३GHz क्वाड-कोर मीडियाटेक प्रोसेसर आणि २ जीबीचे रॅम त्याचबरोबर २६ जीबी इनबिल्ट स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे. याचा रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा ऑटोफोकस तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा आहे. याचे ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड ५.१ लॉलिपॉप बेस आहे. याच्या बॅटरी क्षमता 2500mAh एवढी आहे. यात ३जी, जीपीआरएस/एज, वाय-फाय, ब्लूटूथ, एफएम रेडिओ, मायक्रो यूएसबी २.०, जीपीएस/ ए-जीपीएस अशा कनेक्टीव्हिटी देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment