समाजाशी कॉर्पोरेट कंपन्यांनी बांधिलकी जपावी- रघुराम राजन

raghuram-rajan
दावोस- कॉर्पोरेट कंपन्यांनी समाजाशी असलेली बांधिलकी आणि समाजाप्रत असलेली आपली जबाबदारी ओळखून वागावे असा सल्ला भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला.

केवळ समभागांचे मूल्य आणि नफेखोरीकडे लक्ष न देता सामाजिक उपक्रम हाती घ्यावेत असे ते म्हणाले. त्यांनी आपले विचार शिकागो विद्यापीठामध्ये कॉर्पोरेट सोशल रिसपॉसिंबिलिटीवर चर्चासत्रात मांडले. केंद्रीय बँकांनी देखील केवळ व्याजदरात कमी अधिक बदल न करता ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. कंपनीच्या भागीदारांसाठी आम्ही आमच्या समभागांचे मूल्य वाढवत आहोत असे कारण कंपन्या नेहमी पुढे करतात. समभागधारकांच्या नावाखाली केलेली प्रत्येक गोष्ट ही कंपनीच्या, समभागधारकांच्या आणि पर्यायाने समाजाच्या उपयोगाचे असेल असे नसते. समभागांचे मूल्य वाढवणे म्हणजे काही कर्मचारी जास्त फायदा मिळवून देणे परंतु त्याचा फायदा समभागधारकांना वाटणे होय. जर केवळ समभागांचे मूल्य वाढवले जात असेल ते समाजाच्या हिताचे नाही असे ते म्हणाले.

Leave a Comment