सात राज्यात प्लास्टिक पार्कचे निर्माण

plastic
नवी दिल्ली : सात राज्यांमध्ये प्लास्टिक उद्योगामध्ये स्टार्टअपची संधी देण्यासाठी प्लास्टिक पार्क तयार करण्यात येत असून यामधील गुजरातमध्ये तर पार्कची उभारणीही करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये प्लास्टिक पार्क तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून मध्यप्रदेशमध्ये प्लास्टिक पार्क चालू वर्षात तयार करण्यात येणार आहे. तर अन्य दोन राज्यांमध्ये दोन वर्षात पार्क पूर्ण करण्यात येणार आहेत.

गुजरातच्या दाहेजमध्ये प्लास्टिक पार्क तयार झाले आहे. तर उत्तर प्रदेशच्या औरेयामध्ये पार्क तयार करण्याचे काम सुरू आहे. मध्यप्रदेशच्या टामोटमध्ये जुलैपर्यंत पार्कची निर्मित्ती पूर्ण करण्यात येणार आहे. ओरिसातील पारादीप, कर्नाटकमधील बेंगळूरमध्ये, राजस्थानमधील उडवारिया आणि आसाममधील तिनसुकीया येथे या पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे.

Leave a Comment