शनिवार वाड्याचा मुख्य दरवाजा तब्बल २८४ वर्षांनी उघडला !

shaniwar-wada
पुणे: आज पहिल्यांदाच पुण्याची ऐतिहासिक ओळख असलेल्या शनिवारवाड्याचा मुख्य दरवाजा उघडण्यात आला असून या वाड्याच्या बांधकामाला तब्बल २८४ वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. याच दिवसाचे औचित्य साधून पुरातत्व विभागाकडून हा दरवाजा पुन्हा उघडण्यात आला आहे.

आज (शुक्रवार) १ तासभर हा दरवाजा पुणेकरांसाठी उघडा ठेवण्यात आला आहे. हा वाडा पर्यटकांना आतून पाहता येणार आहे. या वाड्याची जबाबदारी १९१३ साली पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली होती. यानंतर हा दरवाजा महत्त्वाच्या दिवसांशिवाय कधी उघडण्यात आला नव्हता. वर्षातून चार वेळाच हा दरवाजा उघडण्यात येतो. तो म्हणजे १५ जानेवारी, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे रोजी याव्यतिरिक्त हा मुख्य दरवाजा वर्षभर बंद असतो. मात्र आजच्याच दिवशी १७३२ साली शनिवार वाड्याची वास्तूशांती होती. त्यानिमित्तानेच आज हा दरवाजा पुन्हा उघडण्यात आला आहे.

1 thought on “शनिवार वाड्याचा मुख्य दरवाजा तब्बल २८४ वर्षांनी उघडला !”

Leave a Comment