केंद्राची ग्राहकांच्या हक्क संरक्षणासाठी नवी योजना तयार

paswan
नवी दिल्ली- केंद्र सरकार ग्राहकांचे हित आणि हक्क संरक्षणासाठी नवी योजना सुरू करण्यात असून १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिनाचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्याहस्ते ही योजना लागू करण्यात येणार आहे.

ही योजना कारखाने, तक्रार निवारण आणि योजनेची अंमलबजावणी या तिन्ही बाबींचा विचार करुन विकसित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत या भागीदारांना राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय ग्राहक हेल्पलाइनने जोडण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांच्या हक्कांबद्दल समाजात जनजागृती करण्यात येणार आहे. सोशल-कार्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत अनेक कंपन्यांना या प्रकल्पाशी जोडण्यात येणार आहे. खोट्या आणि फसव्या ब्रॅंड्सविरोधात कठोर कारवाई केली जाईल. २०१५ मध्ये ग्राहक सुरक्षा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आहे. यावर पुनर्विचार करण्यात येणार आहे. खराब उत्पादने त्वरित बदलून मिळावीत यासाठी प्रयत्न होणार आहेत. इ-कॉमर्सदेखील या विधेयकाच्या कक्षेत येणार आहे.

Leave a Comment