फ्लिपकार्टवर स्मार्टफोनच्या किंमतीत भरघोस कपात

flipkart
मुंबई: ई शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टने अनेक गॅझेट, स्मार्टफोनवर नववर्ष आणि ख्रिसमस सेलच्या नंतर आता प्रजासत्ताक दिनानिमित्त भरघोस ऑफर दिल्या असून अनेक स्मार्टफोनच्या किंमतीत या ऑफरमध्ये कपात केलेली आहे. तसेच एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना कॅश बॅक ऑफर आणि शानदार एक्सचेंज ऑफर मिळणार आहे. असे अनेक धमाकेदार स्मार्टफोन डील फ्लिपकार्ट आपल्यासाठी घेऊन आले आहे.

नेक्सस ६पी ३२ जीबी याची किंमत रु. ३९,४९९ असून यावर ३,५०० रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये किमान २०,००० पर्यंत सूट मिळू शकते. नेक्सस ५एक्स १६ जीबी ज्याची किंमत रु. २०,९९० आहे. ज्यावर तुम्हाला १००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

तर दुसरीकडे लेनोव्हो वाइब पी१ हा स्मार्टफोन सध्या बाजारात १४,९९९ रुपयांना उपलब्ध असून यावर १००० रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच ७,००० पर्यंत एक्सचेंज ऑफरही मिळेल. ४जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज असलेल्या आसूस झेनफोन २ ची किंमत रु. १६,९९९ आहे. ज्यावर २००० रुपयापर्यंत सूट मिळणार आहे. तर ७००० पर्यंत एक्सचेंज ऑफर मिळू शकते.

१६ जीबीच्या मोटोरोला मोटो एक्स स्टाइल मॉडेलची किंमत २६,९९९ रु. असून ज्यावर ३००० रुपयाची सूट आहे. तर एक्सचेंज ऑफरमध्ये १२,००० पर्यंत सूट मिळणार आहे. मोटोरोलाच्याच मोटो एक्स प्ले ३२ जीबी मॉडेलची किंमत १७,९९९ रुपये असून यावर एक्सचेंज ऑफरमध्ये ७,००० रुपयापर्यंत सूट मिळू शकते.