‘टीव्हीएस’ची ‘अपाचे RTR २००’ लॉन्च

tvs
मुंबई : ‘अपाचे RTR २००’ ही बाईक टीव्हीएस मोटर्सने नुकतीच लॉन्च केली आहे. या बाईकची दिल्लीत किंमत ८९ हजार ९९० रुपये आहे. टीव्हीएसने मोठ्या कालावधीनंतर मोठ्या अपेक्षेने ‘अपाचे RTR २००’ लॉन्च करत बाजारात पुनरागमन केले आहे. टीव्हीएसने याचवेळी ‘व्हिक्टर’ही देखील नव्या रुपात लॉन्च केली आहे.

आपले दुचाकी बाजारात वर्चस्व वाढवण्यासाठी ‘अपाचे RTR २००’ लॉन्च करणे कंपनीसाठी महत्त्वाचे होते. त्याचबरोबर दुचाकी बाजारात नक्की आमचे वर्चस्व वाढवू, असे ‘टीव्हीएस’चे अध्यक्ष वेणु श्रीनिवास यांनी सांगितले.

बाईकची आकर्षक डिझाईन पाहून ‘बीएमडब्ल्यू जी ३१० आर’ची नक्की आठवण येईल. किंबहुना याच बाईककडून टीव्हीएसने प्रेरणा घेतली असावी, अशी शंका निर्माण होते. बजाज पल्सर एएस २०० आणि केटीएम २०० ड्युक यांसारख्या बाईक्सना टक्कर टीव्हीएसची ‘अपाचे RTR २००’ देण्याची शक्यता आहे.

Leave a Comment