समुद्र सफाई करणारी अनोखी स्पाँज बिकीनी

ikini
बिकीनी हे पोहताना घालायचे वस्त्र अनेक कारणांनी नेहमीच चर्चेत असते. आदिकाळापासून महिला ते वापरत आहेत असे सांगितले जाते. आपली सुडौल देहयष्टी दाखविणे आणि त्याचबरोबर लोकांच्या नजरा वेधून घेणे हे काम बिकीनी अचूक करते. बिकीनीबाबत अनेक प्रकारचे संशोधनही होत असते. त्यात आता वैज्ञानिकांनी समुद्रातील प्रदूषक पदार्थांना शोषून घेऊ शकेल, पर्यायाने समुद्राची सफाई होऊ शकेल व बिकीनी घालण्यामागचे अन्य हेतूही साध्य होऊ शकतील अशी बिकीनी तयार केली आहे. स्पॉन्ज बिकीनी असे तिचे नामकरण केले गेले आहे.

या बिकीनीसाठी खास प्रकारचे मटेरियल वापरले गेले आहे. या मटेरियलला स्पॉन्ज असे नांव आहे. थ्रीडी प्रिंटरचा उपयोग करून बनविल्या गेलेल्या या बिकीनीत समुद्रात तेल व रसायनांमुळे जे घातक पदार्थ तयार होतात ते शोषून घेण्याची क्षमता आहे. बिकीनीच्या वजनाच्या २५ पट जास्त वजनाची घाण ही बिकीनी शोषून घेते शिवाय त्यामुळे वापरणार्‍याच्या त्वचेला कोणताही अपाय होत नाही. तिची किंमतही परवडणारी आहे आणि ती रिसायकल करता येते.

Leave a Comment