या देवाच्या दर्शनाने मिळते आरोग्य आणि तंदुरूस्ती

konpira
जपानच्या कागावा प्रांतातील कोनीपारा हे धर्मस्थळ आरोग्य व तंदुरूस्ती देणारे म्हणून प्रसिद्ध असून येथे दरवर्षी शेकडो लोक धावत धावत जाऊन देवाचे दर्शन घेतात. त्यासाठी दरवर्षी येथे स्पर्धाच भरविली जाते व त्यात तीन वर्षांच्या बालकापासून ते ८० वर्षाच्या वृद्धांपर्यंत स्पर्धक सहभागी होतात.

या धर्मस्थळांचे वैशिष्ठ म्हणजे येथे जाण्यासाठी तब्बल ७८५ पायर्‍या चढाव्या लागतात. येथे दरवर्षी या पायर्‍या पळत चढणे व पुन्हा उतरणे अशी स्पर्धा घेतली जाते. यंदाच्या स्पर्धेत ५०० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत भाग घेणे ही एकप्रकारची प्रार्थना असल्याची जपानी लोकांची भावना आहे. या पायर्‍या चढून देवाचे दर्शन घेतले की चांगली प्रकृती लाभते असाही भाविकांचा विश्वास आहे. यंदाची स्पर्धा ४७ वर्षीय ताकामात्सु नावाच्या इसमाने जिंकली. त्याने केवळ १२ मिनिटांत हे अंतर कापले.

हे धर्मस्थळ अतिशय प्राचीन असून ते १ ल्या शतकातले असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment