पाणी, दुधापेक्षाही अमेरिकेत पेट्रोल स्वस्त!

petrol
मुंबई: आंतरराष्ट्रीय राजकारणाची सूत्र ज्या पेट्रोलच्या किंमतीभोवती हालतात, ते पेट्रोल मिनरल वॉटरपेक्षाही स्वस्त होणार आहे. कारण कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात चांगलेच गडगडले आहेत. मात्र, आतंरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव कोसळल्यानंतर भारतात पेट्रोल स्वस्त का होत नाही? या प्रश्नाचे उत्तर अजूनही सर्वसामान्य नागरिक शोधत आहेत.

पाण्यापेक्षा पेट्रोल स्वस्त होण्याची चिन्ह अमेरिकेत निर्माण झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती चांगल्याच गडगडल्या आहेत. २००८च्या जूनमध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल १४८ डॉलर्स होती. तर आता कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल २८ डॉलर्सवर कोसळला आहे. येत्या काही महिन्यांत हा भाव १६ डॉलवर जाऊन पोहणार असल्याचा अंदाज, रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडने वर्तवला आहे.

इराणवरचे निर्बंध अमेरिकेने उठवल्यामुळे इराणकडूनही तेलाचे मोठे उत्पादन सुरू होईल. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची आवक वाढेल. त्यामुळे आधीच घसरणीला लागेलला तेलाच्या दराचा आणखी वेगाने उलट्या दिशेने प्रवास सुरू होईल. अमेरिकेतील मिशीगन शहरातल्या दोन गॅस स्टेशनने ५० सेंट, म्हणजेच ३४ रुपयांच्या आसपास एक लिटर पेट्रोल विकायला सुरूवात केली आहे. मात्र, भारतात पेट्रोल विकत घ्यायचे म्हटळे, तर ६० ते ६५ रुपये मोजावे लागतात. आजही असंख्य कर लावून भारतीयांच्या खिशावर आर्थिक तूट भरून काढण्याच्या नावाखाली राजरोसपणे डल्ला मारला जात असल्यामुळे तूट भरून काढण्यासाठी सरकारला दुसरे कोणतेही साधन दिसत नाही का हा मोठा प्रश्न आहे?

Leave a Comment