अमेरिकेत सॅमसंगचे जुने स्मार्टफोन विक्रीवर बॅन

old-smartfon
सॅमसंगचे जुन्या मॉडेल्सचे स्मार्टफोन अमेरिकेत आता मिळू शकणार नाहीत. अॅपलने सॅमसंगविरोधातील पेटंट चोरीबाबत केलेल्या दाव्याचा निकाल सॅमसंगच्या विरोधात गेल्याने ही बंदी आली असल्याचे समजते. हा निर्णय पुढच्या महिन्यापासून लागू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अॅपलने सॅमसंग विरोधात अॅटोमॅटीकली करेक्ट शब्द टाईप होणे व फोन अनलॉक करण्यासाठी फिंगरप्रिट स्लायडर टक्नॉलॉजीची चोरी केल्याबाबत दावा दाखल केला होता. अॅपलचे हे आरोप न्यायालयाने मान्य करून सॅमसंगला या प्रकरणात दोषी ठरविले आहे. सॅमसंगने न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल तसेच जुने स्मार्टफोन विक्री बॅनबद्द निराशा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सॅमसंगचे फ्लॅगशीप स्मार्टफोन व आत्ताची नवी मॉडेल अमेरिकेच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे ऑनलाईन पोस्ट केले आहे.

Leave a Comment