या गावात केली जाते बुलेटची पुजा; मंदिराचे नाव आहे ‘बुलेट बाबा’

bullet-baba
पाली – राजस्थानमध्ये पाली नावाच्या गावात देवी-देवतांची नव्हे, तर चक्क बुलेट बाईकची पूजा केली जाते. इतकेच नव्हे तर या बुलेटच्या मंदिराला ‘बुलेट बाबाचे मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते.

बुलेट बाबाच्या मंदिराचीही एक खास कथा आहे. येथील चोटिला गावात राहणारे ओम बन्ना उर्फ सिंह राठोह हे गृहस्थ आपल्या बुलेट बाईकवर बसुन आपल्या सासरवाडीहून परत येत होते. दरम्यान रस्त्यावरून यताना त्यांची बुलेट झाडाला धडकली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर ओम बन्ना उर्फ सिंह राठोड यांची बुलेट बाईक रोहिट येथील पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आली. मात्र, दुसऱ्या दिवशी पोलिस जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये आले तेव्हा, त्यांना बाईक न मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली.
bullet-baba1
दरम्यान, ज्या ठिकाणी या बुलेटचा अपघात झाला. त्या ठिकाणी सापडली. असेही सांगितले जाते की ही बुलेट कोणीही सुरू न करता स्वत:हूनच अपघात झालेल्या ठिकाणी गेली. ही बुलेट परत पोलिस स्टेशनला आणन्यात आली. परंतु, दुसऱ्यांदाही हाच अनुभव आल्यानंतर लोकांनी बुलेटला साखळदंडांनी बांधले. मात्र, काही फायदा झाला नाही. बुलेट पुन्हा त्याच ठिकाणी गेली.

तेथील ग्रामिण पोलिस अधिकाऱ्याने या घटनेला चमत्कार मानून ती बुलेट अपघात स्थळीच सोडून दिली. आश्चर्य म्हणजे त्या दिवसापासून या ठिकाणी एकही अपघात झाला नसल्याचे सांगितले जाते. लोक ओम बन्नाचा पवित्र आत्मा येथे निवास करत असल्याची येथील गावकऱ्यांची धारणा आहे. या बुलेट बाबाचा या परिसरात इतका प्रभाव आहे की, पोलिस स्टेशनमधील किंवा इतर कोणीही व्यक्ती या ठिकाणी नव्याने ज्वाईन होत असेल, तर तो पहिल्यांदा बुलेटबाबाच्या मंदिरात जाऊन माथा टेकवतो.

पाली-जोधपुर राष्ट्रीय राज्यमार्गावर बुलेट बाबाचे हे मंदिर असून येथे ओम बन्ना यांची बुलेटही आहे. या बुलेटच्या चारी बाजूंनी चबुतरा बांधण्यात आला असून, मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या मंदिरात दिवसरात्र ज्योत पेटती ठेवली जाते. तसेच येथिल नागरीक बुलेटबाबाला नारळ, फूल, दारू, मटन आदी पदार्थांचा नैवैद्य दाखवतात. दरम्यान, अलिकडील काळात ओम बन्ना बुलेट बाबावर गाणीही गायली जातात. त्याचे गुनगाण गाणारे व्हिडीओ अल्बमही आले आहेत.

Leave a Comment