मांजरे प्रशस्त बंगल्यात आणि मालकीण गाडीच्या ट्राॅलीत

catlady
अमेरिकेत कॅट लेडी म्हणून लोकप्रिय झालेली ६७ वर्षीय लिनिया लतान्जिओ ने प्राणीप्रेमाची अनोखी पातळी गाठली आहे. पाळीव मांजरे कुत्री यांचे घरातील अन्य व्यक्तींप्रमाणे लाड करणे अथवा आपली संपत्ती त्यांच्या नावावर करणे असले प्रकार अमेरिकेला नवीन नाहीत. मात्र लिनियाने त्यापलिकडे जाऊन आपली भूतदया दाखविली आहे. मांजरांची गैरसोय होऊ नये म्हणून ती मांजरांना घरात ठेवते व स्वतः गाडीच्या ट्राॅलीत झोपते.

लिनियाकडे सध्या १ हजार मांजरे आहेत. ती सांगते मी एकटीच आहे आणि १९९२ साली मी पहिले मांजर पाळले. त्यानंतर रस्त्यावरची बेवारशी मांजरे आणून ती पाळायचा मला नाद लागला. या मांजरांनी मला खूपच लळा लावला आहे. त्यांची झोपमोड होऊ नये अथवा त्यांना अन्य त्रास नको म्हणून मी त्यांना घरात ठेवते व मी ट्राॅलीत झोपते. लिनियाचे घर म्हणजे ४२०० चौरस फुटांचा पाच बेडरूम्स असलेल्या बंगला आहे. आता बोला!

Leave a Comment