२,४९९च्या स्मार्टफोनसोबत एकवर्ष इंटरनेट मोफत

datawind
नवी दिल्ली : आकाश टॅबलेट बनविणारी कंपनी डेटाविंडने आपल्याला विश्वास बसणार असे दोन स्मार्टफोन बाजारात उतरवले असून हे स्मार्टफोन अवघ्या २,४९९ आणि ३,९९९ रुपयात उपलब्ध आहेत. याफोनची नावे पॉकेटसर्फर २जी४एक्स आणि पॉकेटसर्फर ३जी४झेड अशी आहेत.

तसेच या स्मार्टफोनवर रिलायंस आणि टेलीनॉरच्या नेटवर्कवर एक वर्षासाठी मोफत इंटरनेटची सुविधाही देण्यात येणार आहे. मात्र यामध्ये ऑडीओ आणि व्हिडीओ डाऊनलोड करता येणार नाही. सध्या सर्व ऑनलाईन वेबसाईटवर मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

कसा आहे पॉकेटसर्फर २ जी ४ एक्स – ३.५इंचाचा याचा डिस्प्ले असून त्याचे रिझोल्यूशन ३२०x४८० पिक्सलचे आहे. यात १ गीगाहर्ट्स, सिंगलकोरचा प्रोसेसर आणि ५१२ एमबीची इनबिल्ट मेमरी असून यात २५६ एमबीचे रॅम देखील देण्यात आले आहेत. याचे ऑपरेटींग सिस्टीम ४.२.२ जेली बीन बेस आहे. यात वाय-फाय, ब्लूटूथ कनेक्टीव्हीटी देण्यात आली आहे.

कसा आहे पॉकेटसर्फर ३ जी ४ झेड – ४इंचाचा याचा डिस्प्ले असून त्याचे रिझोल्यूशन ४८०x८०० पिक्सलचे आहे. यात १ गीगाहर्ट्स, सिंगलकोरचा प्रोसेसर आणि ४ जीबीची इनबिल्ट मेमरी असून ती ३२जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. यात ५१२ एमबीचे रॅम देखील देण्यात आले आहेत. याचे ऑपरेटींग सिस्टीम ४.४.२ किटकॅट बेस आहे. यात २जी, ३जी, जीपीआरएस, वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएस कनेक्टीव्हीटी देण्यात आली आहे.

Leave a Comment