फोर्डने लॉन्च केली नवी इंडेवोअर

ford
नवी दिल्ली – फोर्डने या आर्थिक वर्षात बुधवारी आपली तिसरी नवी एसयूव्ही इंडेवोअर भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली असून या एसयूव्हीची २४.७५ लाख रुपये (एक्स-शोरूम, मुंबई) आहे.
ford1
यापूर्वी फोर्डने २००३ इंडेवोअर आणली होती. तिला मिळालेला प्रतिसाद पाहता कंपनीने नव्या फोर्ड इंडेवोअरला नव्या रंग-रूपात आणली आहे. नव्या इंडेवोअरला फोर्डच्या टी६ प्लेटफॉर्मवर तयार केले गेले असून नवी इंडेवोअर दोन इंजन ऑप्शन सोबत उपलब्ध होईल, ज्यात २.२-लीटर, ४ सिलेंडर डिझेल आणि ३.२-लीटर, ५ सिलेंडर डिझेल इंजनचा समावेश आहे. फोर्ड इंडेवोअरमध्ये प्रोजेक्टर हँडलँप, बोल्ड बंपर, डे-टाइम रनिंग लाइट और एलईडी फॉग लँप सारखे नवे फीचर्स दिले गेले आहेत. गाड़ीची (लांबीxरुंदीxउंची) ४८९२एमएम x१८६० एमएम x१८७३एमएम आहे. याचबरोबर गाड़ीचा ग्राउंड क्लीयरंस २२५mmचा आहे. यासोबतच या गाडीत एलईडी लँप, मल्टी फंक्शन डिस्प्ले, रिमोट एंट्री, पॉवर विंडो, एंटी पिंच, रिअर पार्किंग सेंसर, रेन सेंसिंग वाइपर, डुअल-झोन एसी, क्लाइमेट कंट्रोल, पॉवर फोल्डिंग थर्ड रो सीट आणि टेरेन मॅनेजमेंट सिस्टमसारखे नवे फीचर्स देण्यात आले आहेत.त्याच बरोबर ही गाडी ६ रंगात उपलब्ध असेल. फोर्डच्या या नव्या गाडीची स्पर्धा टोयोटाच्या फोर्च्युनर, शरवोलेटच्या ट्रेलब्लेजर, मित्सुबिशीच्या पजेरो स्पोर्ट आणि ह्युंदाईच्या सांता फेशी असेल.

Leave a Comment