पाचव्या स्वदेशी दिशादर्शक उपग्रहाचे ‘इस्रो’कडून यशस्वी प्रक्षेपण

pslv
श्रीहरीकोटा : आज भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने तयार केलेल्या स्वदेशी बनावटीच्या जीपीएस प्रणालीमधल्या पाचव्या उपग्रहाचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. स्वदेशी मिनी जीपीएस प्रणालीतील IRNSS-1E दिशादर्शक उपग्रहाचे आज सकाळी ९ वाजून ३१ मिनिटांनी अवकाशात उड्डाण पार पडले. हे उपग्रह भारतीय उपखंडात अचूक स्थान – वेळ सांगण्याचे काम करतील. PSLV-सी ३१ या अत्यंत भरवशाच्या रॉकेटच्या सहाय्याने IRNSS-1E हा उपग्रह कक्षेत सोडला गेला.

सध्या आपण वापरत असलेली ग्राऊंड पोझिशनिंग सिस्टिम, म्हणजेच जीपीएस प्रणाली परदेशी आहे. मात्र इस्रोने स्वतःची प्रणाली विकसित केली आहे. सात उपग्रहांच्या क्लस्टरद्वारे ही प्रणाली काम करेल. याचा फायदा संरक्षण दल, आपत्कालीन व्यवस्थापन, वैज्ञानिक प्रयोग तसेच वाहतूक व्यवस्थापन, पुरातत्व विभाग येथे याचा फायदा होईल. क्लस्टरमधले उर्वरित दोन उपग्रह फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाशात पाठवले जातील. आजच्या मोहीमेच्या यशानंतर PSLV या प्रक्षेपकाचे हे सलग ३१वे यशस्वी उड्डाण आहे.

Leave a Comment