व्हॉट्सअॅपचे वार्षिक शुल्क बंद

whatsapp
मुंबई : व्हॉट्सअॅप कंपनीने या वर्षापासून वार्षिक सदस्यता शुल्क बंद करण्याचा निर्णय घेतला असून व्हॉट्सअॅपसाठी १ डॉलर (६८ रुपये) वार्षिक शुल्क होते. व्हॉट्सअॅपचे वार्षिक शुल्क आगामी काही आठवड्यात पूर्णपणे बंद केले जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड व्हॉट्सअॅप युजर्सकडे नसल्यामुळे आगामी काही आठवड्यांमध्ये व्हॉट्सअॅपच्या सर्व व्हर्जनचे शुल्क हटवले जाईल. त्यामुळे व्हॉट्सअॅप आता पूर्णपणे मोफत असेल, असे कंपनीने एका ब्लॉग पोस्टद्वारे सांगितले. आतापर्यंत व्हॉट्सअॅपच्या काही युजर्सना एका वर्षानंतर वार्षिक शुल्क आकारले जात होते. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे अनेक युजर्सकडून हे शुल्क घेण्यात आले होते. हे शुल्क भरल्यानतंरच व्हॉट्सअॅपची सेवा एका वर्षासाठी मोफत दिली जात होती. जगभरात व्हॉट्सअॅप युजर्सच्या संख्येने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

Leave a Comment