मारुती ‘एस क्रॉस’च्या किंमतीत घसघशीत सूट

maruti
नवी दिल्ली : आपल्या ‘एस क्रॉस’ या कारच्या किंमतीत मारुती-सुझुकीने घसघशीत कपात केली असून कंपनीने हा निर्णय गेल्या सहा महिन्यात १७ हजार यूनिट्सहून अधिक कमी विक्री झाल्याने घेतला आहे. आता ‘एस क्रॉस’च्या किंमतीत २ लाखांची सूट दिल्याने आता या कारच्या व्हेरिएंट्स ८.३४ लाख ते ११.६९ लाख रुपयांदरम्यान मिळणार आहेत.

१.६ लिटर व्हेरिएंटच्या दरांमध्ये झालेली कपातीमुळे ‘एस क्रॉस’चे बेस मॉडेल आता ९.९४ लाख रुपयात, मिड मॉडेल १०.९४ लाख रुपये आणि टॉप एंड मॉडेल ११.६९ लाख रुपयात उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर कंपनीने १.६ लिटर व्हेरिएंटच्या किंमतीमध्ये २ लाख ५ हजार रुपयांची कपात केली आहे. त्याचवेळी १.३ लिटर व्हेरिएंटच्या किंमतीमध्ये ४० हजार ते ६६ हजार रुपयांदरम्यान कपात केली आहे.

Leave a Comment