भारतात सलग दुसऱ्या दिवशीही ट्विटर ‘डाऊन’

twitter
नवी दिल्ली – भारतात आठवड्यात सलग दुसऱ्यांदा ट्विटरची साईट ‘डाऊन’ झाल्यामुळे मंगळवारी नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली. डेस्कटॉपवर ट्विटर साईट उघडण्याचा प्रयत्न केला तर त्यावर तांत्रिक अडचणीचा संदेश येत असल्यामुळे साईटवर लॉग इनच करता येत नव्हते.

केवळ डेस्कटॉपवरच ही समस्या येत होती. आयओएस आणि अॅंड्राईड अॅप्सवर ट्विटर व्यवस्थित सुरू असल्याचे दिसून आले. डेस्कटॉप साईटवर जाण्याचा प्रयत्न केल्यास “Something is technically wrong.Thanks for noticing—we’re going to fix it up and have things back to normal soon.” असा संदेश येत होता.

ट्विटरकडून ही तांत्रिक अडचण कशामुळे येत असल्याची माहिती अजूनही अधिकृतपणे मिळालेली नाही. पण भारतात ट्विटरची सेवा भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी संध्याकाळी ७.५३ ते ८.०३ या काळातही ठप्प झाली होती. काल मोबाईलवरूनही ट्विटर बघण्यास युझर्सना अडचण येत होती. मात्र, त्यानंतर तांत्रिक अडचण दूर करण्यात आली असून, आता ट्विटर सेवा व्यवस्थित सुरू असल्याचे ट्विटरच्या ब्लॉगवर लिहिण्यात आले होते.

Leave a Comment