फेसबुकचे नवे अॅप ब्राउजर लवकरच

faceook
जगात अग्रणी सोशल मिडीया साईट म्हणून नांव असलेल्या फेसबुकने त्यांच्या युजर्ससाठी नवा चांगला अॅप ब्राऊजर विकसित करण्याचे काम हाती घेतले असून हा अॅपब्राऊजर लवकरच युजर्सना उपलब्ध करून दिला जाणार आहे. सध्या या ब्राऊजरच्या चाचण्या सुरू आहेत.

नव्या अॅप ब्राऊजरमुळे युजर अॅप न सोडताही दुसरी पेज चेक करू शकणार आहेत. तसेच ब्राउज करतानाही युजरला अधिक सुलभपणे ते करता येणार आहे. ब्राऊज करताना युजरला येणार्‍या अनेक अडचणी या नव्या अॅप ब्राऊजरमुळे संपुष्टात येणार आहेत असाही कंपनीचा दावा आहे. युजरला या अॅप ब्राऊजरमध्ये नवा बार मिळणार आहे व त्यावर कोणती पोस्ट किती आवडली याचा फिडबॅक मिळणार आहे. तसेच युजरसाठी बॅक व फॉरवर्ड बटण असून त्यामुळे युजर बुकमार्क पेजवर जाऊ शकेल. नव्या ब्राऊजरमध्ये फिचरसाठी मेन्यू बटणही आहे असेही समजते.

Leave a Comment