केंद्राच्या सुवर्ण ठेव योजनेत ३५ किलो सोने जमा करणार सोमनाथ मंदिर

somnath-temple
अहमदाबाद – सुमारे ३५ किलो सोने केंद्र सरकारच्या सुवर्ण ठेव योजनेत जमा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्‍वस्त असलेल्या गुजरातच्या अहमदाबाद येथील सोमनाथ मंदिर देवस्थानाने घेतला आहे. नुकतीच विश्‍वस्त मंडळाने सुवर्ण ठेव योजनेत सहभागी होण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे.

देवस्थानाचे ३५ किलो सोने विश्‍वस्त मंडळाने तिजोरीत ठेवले आहे. या सोन्याचा दैनंदिन वापर नसल्याने ते सुवर्ण ठेव योजनेत जमा करण्यात येणार असल्याची माहिती विश्‍वस्त मंडळाचे सचिव पी. के. लाहिरी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. सोन्याचा फार मोठा साठा मंदिराच्या विश्‍वस्त मंडळाकडे नाही. मंदिराच्या दररोजच्या डेकोरेशनकरिता सोन्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यानंतर केवळ ३५ किलो सोने शिल्लक राहाते. ते सोने आम्ही सुवर्ण ठेव योजनेत जमा करणार आहोत, असे लाहिरी यांनी सांगितले.

Leave a Comment