आता रंगीत मतदान ओळखपत्र मिळणार!

voter-id
मुंबई : खूप फेऱ्या सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी माराव्या लागतात. मग ते मतदान कार्ड काढायचे असले तरी. पण आता या फेऱ्यामधून तुमची सुटका होणार असून तुम्ही हे मतदान ओळखपत्र तुमच्या हातातील स्मार्टफोनवरही मिळवू शकणार आहात ते ही रंगीत ओळखपत्र.

काय करावे लागणार आहे रंगीत मतदान ओळखपत्रासाठी :

१. नोंदणी : स्वतःचा ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर असणे रंगीत मतदान ओळखपत्राच्या नोंदणीसाठी आवश्यक असल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना तुमच्याशी संपर्क साधता येईल. http://www.nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करा.

२. माहिती : तुम्हाला स्वतःची संपूर्ण माहिती रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर भरायची आहे. माहिती भरताना ती व्यवस्थित भरा. त्यानंतर शेवटी तुमचा एक रंगीत फोटो अपलोड करा.

३. सेव्ह करा : माहिती भरल्यानंतर फाइल सेव्ह करा. माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर किंवा काही माहिती भरणे बाकी असेल तर तुम्ही ती १५ दिवसाच्या आत भरू शकता.

४. कागदपत्र : पासपोर्ट, दहावीचे मार्कशीट, जन्म दाखला, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, आधार कार्ड, बँक पासबूक, फोन, पाणी,वीज बिल, इन्कम टॅक्स – फॉर्म १६, यापैकी कोणतेही २ डॉक्युमेंट्स मतदान ओळखपत्रासाठी स्कॅन करून अपलोड करावे.

५. ओळखपत्र : संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर महिन्याभरात तुमचे रंगीत मतदान ओळखपत्र तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येईल.

2 thoughts on “आता रंगीत मतदान ओळखपत्र मिळणार!”

Leave a Comment