यंदा जरूर ट्राय करा ही ऑफबीट डेस्टीनेशन्स

[nextpage title=”यंदा जरूर ट्राय करा ही ऑफबीट डेस्टीनेशन्स”]
collarge
जगाला भारताची युवा भारत अशी ओळख निर्माण होत असताना येथील युवा वर्ग नक्की काय करतोय? हा युवा वर्ग नक्की बदलतोय हे तर खरेच. कारण पर्यटन म्हणजे एखाद्या रिसॉर्टमध्ये जाऊन राहणे, एखाद्या शहरातील त्याच त्याच पर्यटन स्थळांना भेटी देणे, किंवा सुटी म्हणजे सिनेमे पाहणे अथवा आरामात लोळत पडणे या संकल्पना आत्ताच्या युवा पिढीत नक्कीच बदलत चालल्या आहेत. त्याऐवजी पर्यटन हा छंद म्हणून जोपासण्याची वृत्ती वाढताना दिसते आहे. पर्यटन हा स्वतःचाच शोध असतो. त्यात खूप कांही शिकायला मिळते, स्वतःच्या मर्यादांविषयी जाणून घेता येते आणि नवीन जागा, तेथली संस्कृती तसेच निसर्गातली अनडिस्कव्हर्ड वंडर्स डिस्कव्हर करता येतात ही जाणीव आजच्या युवकांना होते आहे. मग या वर्षात अशीच कांही ऑफबीट डेस्टीनेशन्स ट्राय करताय? त्यासंदर्भातलीच ही माहिती खास पर्यटनप्रेमींसाठी[nextpage title=”१)राफ्टिंग”]
1-raffting
प्रचंड वेगाने खळाळत वाहणारे प्रवाह अनुभवायचे असतील. प्रवाहाबरोबर वाहात जाणे म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर राफ्टिंगसारखा दुसरा मस्त पर्याय नाही. प्रवाहानुसार अॅडजस्ट केल्याशिवाय येथे कांही इलाज नसतोच पण टीम स्पिरीट, साहस याचा अनुभव घेता येतो. शिवाय कदाचित ही तुमच्या वॉटर स्पोर्टस छंदाची सुरवातही ठरू शकते.राफ्टिंगसाठी तुम्ही दंडेली कुर्ग या कर्नाटकातील ठिकाणी जाऊ शकता अथवा महाराष्ट्रात कोलाटची वाट पकडू शकता. उत्साह थोडा जास्त असेल आणि थ्रिल अनुभवांचे असेल तर हृषिकेशमधील गंगा, गढवालमधील टोन, सिक्कीमची तिस्ता, आसामची ब्रह्मपुत्रा किंवा झस्कार व्हॅलीला साद घाला. राफ्टिंगमध्ये किती अंतर तोडायचे त्यावर या खेळाचा खर्च ठरतो पण तो सहज परवडणारा असतो हे नक्की.[nextpage title=”२)स्कूबा डायव्हिंग”]
2-scuba
समुद्रात थोडे खोलवर उतरले तर मरीन लाईफचा लाईव्ह शो तुम्ही पाहू शकता. नेहमीच्या जगापेक्षा कितीतरी वेगळे आणि चमत्कृतीपूर्ण असे हे अंडरवॉटर लाईफ तुम्हाला भुरळ घालेल व वारंवार भेट देण्यास भाग पाडेल हें नककीच. प्रवाळांची बेटे, कधी जन्मात न पाहिलेल्या अनेक जातीच्या माशच्या झुंडी येथे तुमच्या मनोरंजनाला आणि स्वागताला तयार आहेत. अर्थात त्यासाठी स्कूबा डायव्हिंगचे सर्टिफिकेट असावे लागते. पीएडीआयचा सर्टिफिकेट कोर्स फी भरून केला तर जगात कुठेही स्कूबा डायव्हिंग करता येते.एका बुडीसाठी ४ ते ५ हजार रूपये खर्च येतो. भारतात अंदमान, गोवा, पुदुचेरी कर्नाटकातील नेत्रावी बेटांवर स्कूबा डायव्हिंगची सोय आहे. महाराष्ट्रात तारकर्लीला ही सोय लवकरच उपलब्ध करून दिली जात आहे.[nextpage title=”३)ट्रेकिंग”]
3-trakking
बर्फाच्छादित हिमालयाच्या उंच शिखरांवर पडणारी कोवळी सूर्यकिरणे आणि पाहता पाहता सोन्याची होणारी हिमशिखरे पाहायला दोन डोळे अपुरे पडतात हा अनुभव अनेकांनी घेतला असेल. तसेच व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये दूरवर पसरलेले रंगीबेरंगी रानफुलांचे गालिचे, हिमनद्यांवरचा थरार अशा अशी अनेक ऑप्शन्स तुम्हाला ट्रेकिंग मध्ये मिळू शकतात. सुरवात करत असाल तर छोटे ट्रेक प्रथम करा. आजकाल अनेक ट्रेक ग्रुप आहेत त्यात जॉईन व्हा आणि ट्रेकिंग मधली खरी मजा काय असते याचा अनुभव घ्या. ट्रेकिंग साठी येणारा खर्चही आवाक्यातला असतो शिवाय आपल्याच शारिरीक क्षमता जाणून घेता येतात हा फायदा वेगळा. चला तर मग, खडकाळ डोंगर, हिरवीगार कुरणे, हिमालय तुम्हाला साद घालतोय.[nextpage title=”४)जंगल ट्रेल”]
4-jungle
प्राण्यांच्या पायांचे ठसे ओळखायचे, पक्षी निरीक्षण, अनेक प्रकारच्या लहान मोठ्या खारी, किटक, फुलपाखरे, सापसरडे यांच्याशी ओळख करून घ्यायची तर जंगल ट्रेलला पर्याय नाही. मैलोनमैल पसरलेल्या शांत, घनदाट जंगलात ही भटकंती करायची. त्यात हिरवळ, पाणी, खडक, दलदलीची जमीन असा सगळा अनुभव घ्यायचा. मात्र एकट्याने करायची ही गोष्ट नाही. जंगलात जायचे तर उपलब्ध असलेल्या गायडेड टूर निवडा. वन्य जीवनाबद्दल कुतुहल असेल तर जंगल ट्रेल करायला हवाच.[nextpage title=”५)आऊटडोअर कँपिग”]
5-Outdoor-camping
सारखी गर्दी मग ती माणसांची असेल नाहीतर वाहनांची. माणूस उबगतोच. थोडी शांतता मिळाल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही अशी वेळ आली की तंबू आणि कॅपिंगचे साहित्य गोळा करायला सुरवात करा. खुल्या आकाशाखाली, निसर्गाच्या सानिध्यात जा. येथे मोबाईल रेंज येणार नाही याची काळजी जरूर घ्या. अथवा मोबाईल स्वीच ऑफ करा. पहाटे पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने डोळे उघडू द्यात, सूर्योदय न्याहाळताना जिवलग मित्रांबरोबर गप्पांची मैफिल जमू द्या, लोळत आराम करताना खाण्यापिण्याचा आनंद लुटा आणि सूर्यास्ताच्या साक्षीने भविष्यातील ध्येये, जीवन, नातेसंबंध, अध्यात्म अशा कोणत्याही गोष्टींवर हवे तसे मत मांडा. सिली जोक्स तोंडी लावायला हवेतच. रात्रीच्या गडद अंधारात आकाशातली हिरे माणकांची दौलत डोळे भरून पाहा. किटकांचे आवाज ऐका. पहा कामाने आलेला फटीग कसा पाहता पाहता जातो आणि नवीन उत्साह शरीरात कसा संचारतो ते.[nextpage title=”६)सायकलींग ट्रेल”]
6-Cycling-trails
आजकाल या छंदाने प्रौढांनाही वेड लावले आहे. हा खेळाचाही एक प्रकार आहे. अगदी एक दोन दिवसांची सुटीही त्यासाठी पुरेशी आहे. जास्त वेळ असेल तर मनाली स्फिती व्हॅली, सिमला जलरी पास- मनाली, मनाली चंद्रलेक- लाहौल व्हॅली, किंम्पूर व्हॅली, निलगिरी पर्वत अशी टूर काढा. यासाठी चांगल्या सायकलींची गरज आहे पण शहरातून त्या भाड्यानेही मिळतात. चला इटस टाईम टू पेडल.[nextpage title=”७)मोटरसायकल एक्सिपिडीशन”]
7-Motorcycle-expeditions
या छंदाचे अनेक क्लब निघाले आहेत. ते बाईक ट्रीप्स अॅरेंज करतात. ग्रामीण, दुर्गम भागापासून ते जगातील सर्वाधिक उंचीवरील मोटरेबल रोड खारदुंग्ला पास पर्यंत अनेक ठिकाणे त्यासाठी आहेत. सर्व सुरक्षा नियम पाळून करावयाचा हा छंद. रस्त्याकडेला मिळेल त्या ढाब्यावर अथवा टपरीत जेवण, दुर्गम भागात पायी जाणार्‍या खेडूतांना बाईकवर लिफ्ट द्यायची मजा, नवनवीन लोकांशी परिचय आणि ज्या भागात जाल तेथली खोल माहिती व ओळख करून घेण्याची संधी यात मिळते. मग घाला हेल्मेट आणि करा झू)))))))म.[nextpage title=”८)बंगी जंपिग”]
8-Bungee-jumping
बंगी जंपिगसाठीही आज अनेक जागा आहेत. उंच टॉवर्स वरूनही काही ठिकाणी ही सुविधा दिली जाते. अन्यथा हृषिकेश जवळचे मोहन चट्टी व्हीलेज आहेच. येथे खडकावरच प्लॅटफॉर्म बनविला असून त्याची उंची आहे ८३ मीटर्स. देशातला हा एकमेव फिक्स प्लॅटफॉर्म आहे. भीतीवर मात करायचा हा सर्वात उत्तम मार्ग. खर्चही २ हजारांपेक्षा कमीच. मग पाहताय करून?[nextpage title=”९)सफारी फोर बाय फोर”]
9-Safari-in-4X4
अविस्मरणीय आठवणींची साठवण करायची असेल तर कछच्या मिठाचा सागर असलेल्या रणात किवा रामेश्वरजवळच्या धनुषकोडीला अवश्य भेट द्या. पौर्णिमेची रात्र असेल याची खबरदारी नक्की घ्या. टिपूर चांदण्यात वेगळ्याच जगात आल्याचा अनुभव नक्की येईल.[nextpage title=”१०)कयाकिंग”]
10-Kayaking
कयाकिंगसाठी आधी त्याचे प्रशिक्षण घ्यायला हवे. केरळ बॅकवॉटर्स, गोवा, हिमालयातल्या नद्या, अशी अनेक ठिकाणे तुमच्या स्वागतासाठी हजर आहेत. सुरवात करत असाल तर मात्र संथ नदी व जेथे प्रवाह मॅनेजेबल असतील अशा ठिकाणी करा.[nextpage title=”११)धबधबे”]
11-waterfall
भारतात आजही अनेक अनएस्प्लोअर्ड धबधब्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. प्रसिद्ध असलेले धबधब टाळा आणि आपण कधी ऐकलेलेही नाहीत अशा धबधब्यांचा शोध घ्या. कांही ठिकाणी थोडा ट्रेक करावा लागेल, जंगलवाट तुडवावी लागेल, खडक चढावा लागेल पण हे कष्ट वर्थ ठरतील. जोग फॉलस, दूधसागर येथे पर्यटक जातात पण तुम्ही मेघालयमधला जोखली काई, मिझोराममधला वाँटवाँग, झारखंडचा लोढ, छत्तीसगडचा तीर्थ यांची निवड नक्की करू शकता.[nextpage title=”१२)ग्रामीण भागात पदभ्रमण”]
12-gramin
ही एक प्रकारची शोध यात्रा आहे. तेथील संस्कृतीची ओळख, परंपरने चालत आलेले ज्ञान, अनेक दंतकथा तुम्हाला समजून घेण्याची संधी हे पर्यटन देते. आठवड्याभराची किंवा थोडी मोठी सुटी मिळाली तर २००-२५० किमीचा पायी प्रवास करता येतो. जेथे दळणवळणाच्या फारशा सोयी नाहीत अशा ठिकाणी या सहली जातात. सोसायटी ऑफ रिसर्च अॅन्ड इनिशिएटिव्ह फॉर सस्टेनेबल टेक्नॉलॉजी अॅन्ड इन्स्टिटयूट ( सृष्टी)तर्फे वर्षातून दोन वेळा अशा सहली काढल्या जातात. हा केवळ प्रवास नाही तर त्यापलिकडचे खूप महत्त्वाचे कांही तरी आहे याचा अनुभव येथे मिळतो.

Leave a Comment