यंदाच्या वर्षात १० हजार नवीन एलपीजी डिलर

lpg
यंदाच्या वर्षात म्हणजे २०१६ मध्ये देशभरात १० हजार नवीन एलपीची डिलर नेमण्याचे ध्येय केंद्र सरकारने नजरेसमोर ठेवले असल्याचे केंद्रीय तेल आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेश प्रधान यांनी सांगितले. स्वयंपाकासाठीच्या गॅसच्या वितरणासंदर्भात नवीन निती आराखडा तयार केला गेल्याचे सांगून ते म्हणाले की या आठवड्यात मुंबईत एलपीजी वितरक निवड प्रक्रियेसंदर्भातील चर्चा पूर्ण केली गेली आहे.

या संदर्भात लोकसभा राज्यसभा खासदारांना पत्रे पाठविली गेली आहेत तसेच राज्य सरकारांकडूनही सूचना मागविल्या गेल्या आहेत. २०१६ हे वर्ष स्वयंपाक गॅस ग्राहक वर्ष ठरेल. त्यासाठी १० हजार नवीन वितरक नेमले जातील तसेच गॅस नोंदणी ऑनलाईन केली गेली आहे. रॉकेल सबसिडीही गॅस सबसिडीप्रमाणेच थेट ग्राहकाच्या खात्यात जमा करण्याची योजनाही कार्यान्वित करण्यात आली असून प्राथ्मिक पातळीवर त्यासाठी ७ राज्यातील ३३ जिल्ह्यात हे काम सुरू झाले आहे.

Leave a Comment