महिला आणि दलितांना ४०० वर्षांनंतर खुले झाले मंदिराचे दरवाजे

parshuram
देहरादून : गढवाल येथील परशुराम मंदिरात गेली ४०० वर्षे प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता त्या दलितांना आणि महिलांना यापुढे खुला होणार आहे.

यासंबंधीचा एक निर्णय नुकताच मंदिर प्रशासनाने घेतला असून मंदिर प्रशासनाने बदलत्या काळासोबत बदलले पाहिजे; म्हणून यापुढे सर्वांचे मंदिरात स्वागत केले जाईल, असे कारण दिले आहे. यापुढे एक पाऊल टाकत आता मंदिरात कोणत्याही प्रकारचा पशू बळी दिला जाणार नसल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे.

यासाठी गेली अनेक वर्षे अनेक दलित संघटना लढा देत होत्या. याच परिसरात आजही अनेक मंदिरे आहेत जिथे दलितांना प्रवेश नाकारला जातो, तिथेही लढा सुरू राहील असे दलित संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले आहे. केरळमधील शबरीमाला मंदिरात मासिक पाळी सुरू असणाऱ्या महिलांना प्रवेश नाकारण्यावरून सुरू असलेल्या वादामुळे या निर्णयाला महत्त्व आले आहे.

Leave a Comment