चालकरहित कारची बर्फाच्छादित रस्त्यावर चाचणी यशस्वी

ford
चालकरहित कार विकसित करण्याच्या स्पर्धेत अमेरिकेतील नामवंत कंपनी फोर्डने आघाडी घेतली असून त्यांनी ही कार बर्फाने झाकलेल्या रस्त्यांवर चालविण्याच्या चाचण्या यशस्वी झाल्याचे जाहीर केले आहे. गेले वर्षभर या चाचण्या सुरू होत्या. मिशिगन विद्यापीठाने तयार केलेल्या मॉडेल सिटीत या चाचण्या घेतल्या गेल्या.

रस्ते बर्फाने झाकलेले असतील तरी या कार आसपासचे वातावरण पाहून नेव्हीगेट करू शकतात. त्यासाठी कारला आसपासची परिस्थिती कळावी म्हणून तिला लाईट डिटेक्शन व रेंजिंग ( लिडार) सेन्सरची मदत होते. हे सेन्सर लेजरबीम सोडतात व ती किरणे परत फिरण्याच्या वेळेनुसार वस्तू ओळखल्या जातात. ही प्रक्रिया अतिशय वेगाने घडते. जमिनीपेक्षा जमिनीवर असलेल्या वस्तू म्हणजे झाडे, इमारती, अन्य साईन्स ओळखाता यावेत यातर्हेमनेच या सेन्सरचे प्रोग्रॅमिंग केले गेले आहे. या सेन्सर्सनी मिळविलेली माहिती कारमधील संगणक विश्लेषित करतो. त्यासाठी संगणकात रोडमॅप अगोदरच भरला जातो व त्या मॅपशी तुलना करून बर्फ असलेल्या रस्त्यांची माहिती मिळविली जाते. परिणामी खराब हवेतही ही चालकरहित कार रस्ते ओळखू शकते.

Leave a Comment