साडे चार लाखांत महिंद्राची नवी एसयूव्ही केयूव्ही १००

mahindra
पुणे : नुकतीच पहिल्यांदाच गाडी खरेदी करू इच्छिणाऱ्या तरुणांच्या गरजा लक्षात घेऊन एक नवीन गाडी भारतीय वाहननिर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिंद्रा कंपनीने बाजारात उतरवली आहे. केयूव्ही १०० असे या नवीन गाडीचे नाव असून यामध्ये ११९८ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. केयूव्ही १००ला कंपनीने के२, के२प्‍लस, के४, के४ प्‍लस, के६ आणि के८ अशा नावाने ७ अशा वेगवेगळ्या व्हेरिएन्टमध्ये बाजारात उतरवले आहे.

मारुतीची ‘स्विफ्ट’ किंवा ह्युंडाईची ‘आय १०’ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यातचा कंपनीचा मानस आहे. या गाडीची किंमत ४.४२ लाख रुपयांपासून असून वेगवेगळ्या व्हेरियन्टमध्ये आणि सुविधांमध्ये ही गाड़ी ६.७६ लाखांत उपलब्ध होऊ शकेल. सर्वात कमी किंमत पेट्रोल व्हर्जन गाड्यांची आहे तर डिझेल व्हर्जनसाठी कमी कमी ५.२२ लाख रुपये आहे. डेज़लिंग सिल्वर, एक्वामरीन ब्लू पर्ल व्हाइट, डिजाइनर ग्रे, फिएरी ऑरेंज, फ्लैमबॉएंट रेड और मिडनाइट ब्लैक अशा सात रंगांत ही गाडी उपलब्ध असेल.

Leave a Comment