बँकेच्या सर्व सेवा आता एटीएममधून मिळणार

atm
नवी दिल्ली – आपल्याला आता विविध बँकिंग सेवा मिळविण्यासाठी बँकेच्या शाखेमध्ये जाण्याची गरज नाही. बँकेच्या एटीएमवर सेवा देण्याबाबतचे नियम आरबीआयने सुलभ केल्यामुळे ग्राहकांना अनेक सेवा एटीएमच्या माध्यमातून उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. ग्राहकांचा मोठा वेळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे वाचण्यासाठी मदत होणार आहे.

आता आपल्याला आरबीआयने नियमात बदल केल्यामुळे एटीएममधून रेल्वे तिकीट, वीज बिल, टेलिफोन बिल, घरगुती गॅस बिल, चेक बुक इश्यू करणे, बँक स्टेटमेंट, पैसे जमा करणे, काढणे, फंड ट्रान्सफर, बँकांना ईमेल करणे यासह अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. आरबीआयद्वारा जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, बँक आता ऑफसाईट एटीएमवर अनेक सुविधा देणार आहे. जे बँकेच्या शाखेपासून दूर आहे त्याला ऑफसाइट एटीएम म्हटले जाते. नव्या नियमानुसार ग्राहकांना बँकेतून मिळणाऱया सामान्य सेवा आता एटीएमच्या माध्यमातून मिळणार आहेत. यामुळे ग्राहकांना कमी वेळासाठी बँकेत जावे लागणार आहे.

Leave a Comment