रिलायन्स जिओचा ४जी स्मार्टफोन लाईफ अर्थ वन

life
रिलायन्स जिओने त्यांच्या पहिल्या स्मार्टफोनची घोषणा केली असून हा फोर जी फोन त्यांच्या लाईफ ब्रँडखाली येणार आहे. या फोनचे नामकरण लाईफ अर्थ वन असे केले गेले आहे.

हा फोन अँड्राईड ५.१.१ ओएसवर चालेल. हा ड्युअल सिम फोन ५.५ फुल एचडी अमोलेड डिस्प्लेसह आहे. त्याला ग्राफिक्ससाठी अड्रेनो ४०५ जीपीयू इंटिग्रेटेड सह १३ एमपी व २ एमपीचे ड्युअल रियर कॅमेरे दिले गेले आहेत. शिवाय ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा ही आहे. ३२ जीबीची इंटरनल मेमरी असून ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने ६४ जीबी पर्यंत वाढविता येणार आहे.. कनेकिटव्हीटीसाठी ब्लूटूथ, एलटीई, वायफाय, जीपीएस अशी अन्य ऑप्शन्सही आहेत. फोनसाठी ३५०० एमएएच पॉवरची बॅटरी दिली गेली आहे.

सध्या कंपनी त्यांच्या १ लाखांहून अधिक कर्मचार्‍यांना मोफत जिओ मोबाईल सेवा देत आहे. मार्च एप्रिलपासून सर्वसामान्य ग्राहकांसाठी फोर जी सेवा पुरविली जाईल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment