मायक्रोमॅक्सचा ‘फँटाबुलेट कॅनव्हास’ लाँच

micromax
नवी दिल्ली : ६.८ इंच स्क्रिनचा ‘फँटाबुलेट कॅनव्हास’ हा नवीन स्मार्टफोन स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘मायक्रोमॅक्स’ने लाँच केला असून या फोनची किंमत ७,४९९ रूपये आहे. हा जगातील सर्वांत मोठय़ा स्क्रिनचा स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

कसा आहे मायक्रोमॅक्सचा ‘फँटाबुलेट कॅनव्हास’ – ६.८ इंचाचा आणि १२८०x७२० पिक्सल रिझोल्यूशनचा याचा डिस्प्ले आहे. याचे ऑपरेटींग सिस्टिम :अँड्रॉईड लॉलीपॉप ५.० बेस आहे. तर याचा प्रोसेसर १.३ गीगा हर्टज् क्वॉडकोरचा आहे. यात १ जीबीचे रॅम असून ८ जीबीचा इंटरनल स्टोअरेज क्षमता देण्यात आली आहे. याचा रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सलचा तर फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे. याच्या बॅटरीची क्षमता ३००० एमएएच एवढी आहे. यात ३जी, ३जी, वाय-फाय, ब्ल्यूटय़ूथ ४.० अशा कनेक्टीव्हीटी देखील देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment