तुमच्या मागोमाग स्वतःच चालेल ही बॅग

luggage
इस्त्रायलमधील रोबोटिक्स कंपनीने तुमच्यामागोमाग स्वतःच चालणारी लगेज बॉक्स तयार केली असून प्रवासात कुठेही ती उचलून न्यावी लागणार नाही. तुम्ही जेथे जाल तेथे तुमच्यामागोमाग ती येईलच शिवाय तुम्ही तिच्या मदतीने तुमचे लॅपटॉप, फोन अशी गॅजेटस कुठेही,कधीही चार्जही करू शकाल.

ही बॅग प्रत्यक्षात स्मार्टफोन ब्ल्यूटूथच्या माध्यमातून तुमच्याशी जोडलेली राहणार आहे. तिच्यामध्ये एक कॅमेरा सेंसर बसविला गेला आहे, त्याच्यासहाय्याने ती तुमच्या मागोमाग येऊ शकते. इतकेच नव्हे तर बॅग अन्य कोणी घेण्याचा प्रयत्न केला तर ती अलार्म वाजविेते. त्यामुळे ती चोरीस जाण्याची शक्यता कमी आहे. या बॅगला बॅटरी बॅकअप दिला गेला आहे त्याच्या सहाय्याने कोणतेही डिव्हाईस चार्ज करता येते. विमानतळ, रस्त्यांवर ती सहज चालू शकते मात्र जिने चढउतार तसेच चढाचे रस्ते चढण्यासाठीही ती उपयुक्त ठरावी यावर अधिक संशोधन केले जात आहे. या वर्षअखेरीस ती बाजारात दाखल होईल. आत्तापासूनच ग्राहकांकडून या बॅगेसंदर्भात अनेक चौकशा येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Leave a Comment