तज्ज्ञांनी दिला जगावरील आर्थिक मंदीचा इशारा

akash-jindal
नवी दिल्ली- चीनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेली पीछेहाट आणि कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये होणारी घट यामुळे जगावर मंदीचे सावट असल्याचे मत अर्थतज्ज्ञ आकाश जिंदाल यांनी व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घडणारे कोणतेही बदल भारताच्या अर्थ व्यवस्थेवर परिणाम करीत असल्यामुळे या मंदीचा धोका भारतालाही आहे असे ते म्हणाले. गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या अर्थव्यवस्थेचा आलेख खालावत आहे तेव्हा ही धोक्याची घंटा असल्याचे जिंदाल म्हणाले.

Leave a Comment