चीनचा कमी किमतीचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल

coolpad
नवी दिल्ली- चीनने मोबाईलच्या विश्वात आपला चांगल्या फिचर्ससहीत कमी किंमतीचा स्मार्टफोन स्पर्धेसाठी दाखल केला असून भारतात कुलपॅड मोबाईल कंपनीने ‘कूलपॅड नोट ३ लाइट’ हा स्मार्टफोन दाखल केला आहे. या स्मार्टफोनची किंमत सहा हजार ९९९ रुपये आहे.

मोबाईलप्रेमींच्या पसंतीस कमी किमतीत चांगले फिचर्स देणारा हा स्मार्टफोन उतरणारा आहे. ‘कूलपॅड नोट ३ लाइट’ हा स्मार्टफोन अँमेझोन या ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध करण्यात आला असून शुक्रवारी स्मार्टफोनचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे.

कसा आहे ‘कूलपॅड नोट ३ लाइट’ – याचा डिस्प्ले ५.० इंचाचा असून त्याचे रेझोल्यूशन ७२० x १२८० पिक्सलचे आहे. त्याचबरोबर याचे ऑपरेटिंग सिस्टम ५.१ अँड्रॉईड लॉलिपॉप बेस असून प्रोसेसर एक गिगाहर्टझ क्वाडाकोर स्नॅपड्रॅगनचा आहे. यात तीन जीबीचे रॅमदेखील आहेत. याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा आणि फ्रंट कॅमेरा पाच मेगापिक्सेलचा आहे. याची इंटरनल मेमरी १६ जीबीची आहे आणि याच्या बॅटरीची क्षमता २५०० एमएएच एवढी आहे.

Leave a Comment