‘आरबीआय’च्या कार्यपद्धतीत मोठे बदल आवश्यक – रघुराम राजन

rajan
मुंबई : आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती बँकेच्या कार्यपद्धतीत मोठे बदल आवश्यक असून देशातील संपूर्ण बँकिंग क्षेत्राचे नियमन करणाऱ्या ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’चा कारभारदेखील सशक्त असायला हवे असे म्हटले आहे.

पारंपरिक नोकरशाही पद्धतीने बँकेतील कर्मचाऱ्यांनी काम न करता आधुनिक कार्यपद्धतीचा अवलंब करायला हवे असल्याचे आवाहन देखील यावेळी रघुराम राजन यांनी केला आहे. प्रभावी पद्धतीने काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी संवाद साधणे आवश्यक असून त्यांनी सर्व नियमांचे योग्य पालन करीत बाहेरील जगातील नवनवीन प्रवाहांची ट्रेंड्सची माहिती करुन घेणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.