सर्वसामान्यांना परवडणार आयफोन लवकरच बाजारात

iphone
न्यूयॉर्क : आता सर्वसामान्य यूझर्ससाठी बजेट आयफोन बाजारात आणण्याच्या तयारीत अॅपल कंपनी असून चार इंचांच्या ‘आयफोन ५ई’ ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आयफोन ५एसचे ‘एन्हान्स्ड’ म्हणजेच विकसित मॉडेल असल्यामुळे फोनचे नाव ‘आयफोन ५ई’ असल्याचे वृत्त टेक टाइम्सने दिले आहे.

५एस प्रमाणेच आयफोनचे हे नवे वर्जन असून काही अतिरिक्त फीचर्स त्यात असतील. या बजेट फोनचे नाव ‘आयफोन ६सी’ असेल अशी अटकळ बांधली जात होती, त्याचप्रमाणे आयफोनच्या नव्या मॉडेलचे काही फोटोजही लीक झाले होते, मात्र हे दावे खोटे ठरवून ‘आयफोन ५ई’ हे नाव निश्चित करण्यात आले आहे. आयफोन ५ईची किंमत अंदाजे ३० हजार रुपयांच्या घरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

६४ बीट ए८ प्रोसेसर आणि १जीबी रॅम आयफोन ५ई’मध्ये आहेत. ४ इंचांच्या रेटिना डिस्प्लेसोबत एनएफसी आणि टच आयडी हे फीचर्स अॅड करण्यात आले आहेत. आयफोन ५एसच्या तुलनेत ५ई थीन आणि कमी वजनाचा असेल, असेही म्हटले जाते. आयफोन ६एस सारखी २.५ डी कव्हर ग्लास हे बजेट आयफोनचे वैशिष्ट्य असेल. याचा फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा असून रोज गोल्डप्रमाणे आयफोनच्या नेहमीच्या रंगांमध्ये उपलब्ध असेल. ५एस प्रमाणेच ५ई ला अॅनॉडाईज्ड अॅल्युमिनियम फिनीश असेल. येत्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात आयफोन ५ई उपलब्ध होईल अशी शक्यता आहे.

Leave a Comment