भारतामध्ये जेट इंधन विकण्यास बीपीला परवानगी

bp
नवी दिल्ली – ब्रिटिश पेट्रोलियम (बीपी) ला तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतामध्ये एअरलाईन्सला एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. बीपीला भारतीय एव्हिएशन इंधन पुरवठा क्षेत्रात प्रवेश करण्याची मंजुरी पेट्रोलियम मंत्रालयाने दिली आहे. मात्र सध्या कंपनीला विमान इंधन विकण्याच्या अगोदर पर्यावरण आणि सुरक्षेसह विमानतळ परवाना सादर करावा लागणार आहे.

याबाबत कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये बीपीला एटीएफ विकण्यासाठी मंजुरी मिळाली असून भारतच्या एव्हिएशनमध्ये अनेक संधी असून या क्षेत्रामध्ये आम्ही सहभागी झाल्यामुळे मोठा उत्साह आहे. भारतामध्ये उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे कंपनीच्या अधिका-याने म्हटले आहे. बीपीची संपूर्ण मालकी असणारी उपकंपनी बीपी एक्सप्लोरेशन (अल्फा) ने एटीएफ मार्केटसाठी ११ जून २०१४ ला अर्ज सादर केला होता. कंपनी भारतामध्ये ४७.७ कोटी रुपये डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Leave a Comment