एलईटीव्हीचे दोन स्मार्टफोन २० जानेवारीला भारतात

letv
चीनी कंपनी एलईटीव्ही चे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात २०जानेवारीला दाखल होत आहेत. दिल्लीतील इर्व्हेंटमध्ये कंपनी एलई मॅक्स व एलई वन एस हे दोन स्मार्टफोन सादर करणार आहे आणि त्यांचे भारतीय बाजारात हे पहिलेच स्मार्टफोन आहेत.

एलई मॅक्स गतवर्षी एप्रिल महिन्यात चीनमध्ये लाँच केला गेला आहे तर एलई वन एस आक्टोबर २०१५ मध्ये लाँच झाला आहे. मॅक्साठी ६.३३ इंची क्यूएचडी डिस्प्ले, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी, २१ एमपीचा रियर तर ४ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. फिगरप्रिट सेन्सरसह हा फोन आहे. एलई वन एस साठी ५.५ इंची फुल एचडी डिस्प्ले, ड्युअल सिम,३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, १३ एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी फिचर्स आहेत.

Leave a Comment