आधार कार्डचे जागतिक बँकेकडून कौतुक

aadhar-card
वॉशिंग्टन- आधार कार्डचे जागतिक बँकेने कौतुक केले असून भारत सरकारची त्यामुळे वर्षाला एक अब्ज डॉलरची बचत झाली आहे, असे म्हटले आहे. डिजीटल तंत्रज्ञानामुळे सर्वाचा समावेश, कार्यक्षमता आणि नावीन्यपूर्ण संशोधनाला चालना मिळत असल्याने भ्रष्टाचाराला आळा बसतो, हे आधारकार्डमुळे अधोरेखित झाले असल्याचे बँकेने म्हटले आहे.

आधार कार्डमुळे भ्रष्टाचार कमी करून सरकारचे प्रति वर्षी एक अब्ज डॉलर (६५०कोटी रुपये) बचत होत आहे, असा अंदाज आहे, असे बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ कौशिक बसू यांनी म्हटले आहे. वित्तीय खर्च आटोक्यात आणण्यासाठी आणि अन्य उपयुक्त सेवा देण्यासाठी आधारकार्ड उपयुक्त आहे, असे बसू म्हणाले.

जवळपास १ अब्ज नागरिकांपर्यंत भारतातील आधारकार्ड व्यवस्था पोहचली असून गरीबांना अनेक सेवा सहजपणे उपलब्ध होत असल्यामुळे सरकारलाही कल्याणकारी सेवा चांगल्या रितीने देणे शक्य झाले आहे, असे बसू यांनी सांगितले.

Leave a Comment