१ अब्ज डॉलरची झाली ई-कॉमर्स शॉपक्लूज कंपनी

shopclues
नवी दिल्ली – ऑनलाईन विक्रेती शॉपक्लूज नवीन माध्यमातून निधी उभा केल्यामुळे एक अब्ज डॉलरची कंपनी बनली असून याअगोदर देशातील दोन ऑनलाईन किरकोळ विक्रेत्या कंपन्या फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलही एक अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सहभागी झाल्या आहेत.

सोवरेन वेल्थ फंड जीआयसीच्या मदतीने ही रक्कम शॉपक्लूजने उभी केली आहे. सध्याचे असलेले गुंतवणूकदार टायगर मॅनेजमेंट आणि नेक्सस वेंचर यांनीही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नवीन निधी जमा करण्यात आल्यामुळे कंपनीची एकूण बाजार किंमत १.१ अब्ज डॉलर झाली आहे. सध्या एकूण किती रक्कम जमा करण्यात आली आहे, याबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शॉपक्लूजने यावेळी १० ते ११ कोटी डॉलर रक्कम जमा केली आहे.

Leave a Comment