सिक्कीम ठरले देशातील पहिले ‘ संपूर्ण सेंद्रीय’ राज्य

sikkim
कोलकाता – देशातील पहिले ‘संपूर्ण सेंद्रीय’ राज्य म्हणूने सिक्कीमची निवड करण्यात आली आहे. ७५ हजार हेक्टर शेतजमीन राष्ट्रीय सेंद्रीय उत्पादन कार्यक्रमातील मार्गदर्शक नियमांनुसार सेंद्रीय पद्धती आणि तत्वांचा वापर करून सेंद्रीय जमिनीत रूपांतर करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती देताना सिक्कीम सेंद्रीय मोहिमेचे कार्यकारी संचालक डॉ. अनबल्गन यांनी सांगितले की, १८ जानेवारी रोजी गंगटोक येथे शाश्‍वत शेतीविषयी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या या दर्जाची औपचारिक घोषणा करतील. डिसेंबरच्या अखेरीस संपूर्ण सेंद्रीय हा दर्जा मिळविला आहे. याठिकाणी ७५ हजार हेक्टर शेतजमिनीत शाश्‍वत शेती सुरू करण्यात आली आहे

Leave a Comment