येथील मुस्लिमांना रामनामाच्या जपामुळे मिळते मनाची शांती

shri-ram
अलाहाबाद : गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर प्रदेशातील अलाहाबादमधील मुस्लिम युवक रामनामाचा जप करत असून येथील मुस्लिमांना रामनामाच्या जपामुळे आंतरिक समाधान व शक्ती उर्जा मिळते.

एक इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीनुसार, एका वेगळ्या पद्धतीने नवी परंपरा इलाहाबाद स्थित मुस्लिम युवकांचा समूह जोपासत आहे. हे लोक रामाचे नाव लिहून राम नाम बँकेत जमा करतात. माघ मेळ्यादरम्यान हे रामाचे नाव लिहितात आणि जमा करतात. दहा वर्षांपूर्वी मी याबाबत एका वर्तमानपत्रात वाचले होते. तेव्हापासून मी रामनाम लिहित आहे. याद्वारे मला आंतरिक समाधान, उर्जा, शक्ती मिळते, असे मुस्लिम युवक फैजल खानने सांगितले. याशिवाय या समूहातील अन्य मुसलमान रमजान महिन्यात नमाजही पढतात. तसेच त्यांना भगवदगीताचे श्लोक आणि मंत्रही माहीत आहेत. फैजल खान गेल्या आठ वर्षांपासून राम नाम हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत लिहित आहे. या शहरात असेही मुस्लिम आहेत जे रामनवमी दरम्यान व्रतही ठेवतात.