मोटार बाजारात दाखल होणार मारूतीची ‘विटारा ब्रेजा’

maruti1
नवी दिल्ली : एक नवी एसयुवी मोटार भारताची आघाडीची मोटार उत्पादक कंपनी मारूती सुझुकी बाजारात दाखल करणार असून दिल्लीत येत्या ५ ते ९ फेब्रवारी या कालावधीत होणा-या ऑटो एक्पोमध्ये ही नवी मोटार सादर करण्यात येणार आहे. या नव्या मोटारीचे नाव ‘मारूती विटारा ब्रेजा’ असे आहे.
maruti
या मोटारीची दिल्ली एक्सशोरूमध्ये किंमत ६.७९ लाख ते १३.७७ लाखापर्यंत असेल. फोर्डच्या इकोस्पोर्ट, महिंद्राची टीयूवी ३००, रेनो डस्टर आणि हुंडाई क्रेटा या मोटारींसोबत मारूती विटारा ब्रेजाची स्पर्धा असणार आहे. विटारा ब्रेजाचे डिझाईन जगभरात विक्री केल्या जाणा-या ‘ऑल-न्यू विटारा’वर आधारीत आहे. यामध्ये एक फ्लोटींग रूफ, स्लोपींग रूफलाईन आणि एक जनरल ईजी डिझाईनचा समावेश आहे.