नवी दिल्ली – फ्रान्सची दूरसंचार कंपनी ऑरेंजला आपल्या सहाय्यक कंपन्या बुरकिना फासो आणि सिएरा लिओने यांना विकण्याच्या तयारीत भारती एअरटेल असून यासाठी ऑरेंजसोबत भारताची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलने एक करार केला आहे. या करारामुळे भारती एअरटेलला विदेशी चलनात होत असलेल्या चढउतारात अफ्रिकामध्ये आपले नुकसान कमी करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.
ऑरेंजने केली भारती एअरटेलच्या दोन कंपन्यांची खरेदी
या दोन्ही कंपन्यांचे ऑरेंज १०० टक्के शेअर्स खरेदी करणार असून दोन्ही कंपन्यांचा एकूण महसूल जवळपास २७.५ कोटी युरो आहे. हा व्यवहार ऑरेंजच्या सहाय्यक कंपन्या कोटे डिआयवोरी आणि सेनेगल यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सध्या कंपनीने या कंपन्यांच्या विक्रीतून मिळणा-या रकमेची माहिती दिलेली नाही.